मुंबई विमानतळावर अडीच किलो सोने जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विमानतळावर अडीच किलो सोने जप्त
मुंबई विमानतळावर अडीच किलो सोने जप्त

मुंबई विमानतळावर अडीच किलो सोने जप्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने केलेल्या कारवाईत १.१७ कोटी रुपयांचे सुमारे अडीच किलो सोने जप्त केले आहे. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी मुंबईतील रहिवाशाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद सुफियान वाघू असे आरोपीचे नाव असून तो दक्षिण मुंबईतील सात रस्ता परिसरामधील रहिवासी आहे. आरोपीवर सीमा शुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटला मिळालेल्या माहितीवर कारवाई करत, बुधवारी (ता.३) रात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेद्दाहहून आलेल्या आरोपीची तपासणी केली. तपासणीदरम्यान आरोपीकडे सोन्याचा ऐवज आढळून आला. अधिकाऱ्यांनी आरोपीला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीदरम्यान जेद्दाहमधील एका व्यक्तीने त्याला सोने असलेले पॅकेट मुंबईतील एका व्यक्तीला देण्यासाठी दिले होते, त्यासाठी त्याला १५००० रुपये मिळणार असल्याची आरोपीने अधिकाऱ्यांना माहिती दिली. मुंबईत कोणत्या व्यक्तींकडे हे पार्सल पोहोचवायचे होते याचा तपास अधिकारी करत आहे.