पश्चिम रेल्वेची १० लाख प्रवासी संख्या घटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेची १० लाख प्रवासी संख्या घटली
पश्चिम रेल्वेची १० लाख प्रवासी संख्या घटली

पश्चिम रेल्वेची १० लाख प्रवासी संख्या घटली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.२ : कोविडपूर्वी पश्चिम रेल्वेची दररोजची प्रवासी संख्या ३५ लाखा होती. मात्र, कोविडनंतर आता दररोजची प्रवासी संख्या २५ लाखांच्या घरात आली आहे. जवळपास १० लाख प्रवासी कमी झाले आहेत. त्याचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या महसुलावर पडत आहे. प्रवासी संख्या का कमी झाली यासाठी पश्चिम रेल्वे अभ्यास गट नेमणार असल्याची माहिती शुक्रवारी (ता.२) पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली.

पश्चिम रेल्वेचे नवनियुक्त महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी चर्चगेट येथील पश्चिम रेल्वे मुख्यालायात शुक्रवारी (ता.२) पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी पश्चिम रेल्वेवर सुरु असलेल्या विविध योजना संदर्भात माहिती दिली आहे. कोरोनापुर्वी पश्चिम रेल्वे मार्गावरुन दररोज सुमारे ३५ लाख प्रवासी प्रवास करत होते. परंतु आता प्रवासी संख्या २५ लाखांवर आली आहे. म्हणजे १० लाख प्रवासी घटल्याने पश्चिम रेल्वेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या नेमकी का घटली ? याच्या अभ्यास करण्यासाठी अभ्यास गट नेमण्यात आलेला आहे. या गटाकडून अभ्यास करण्यात येत असल्याची माहिती मिश्र यांनी दिली.

महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी सांगितले की, सध्या बांद्रा-कुर्ला संकुलात अनेक सरकारी-खासगी कार्यालये सुरु झाली आहेत. त्यामुळे प्रवासी आता चर्चगेटला येत नाहीत. त्यातच कोरोनापासून अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुरू ठेवले आहे. त्यामुळे प्रवासी संख्या घटली आहे. परंतु, बांद्रा-कुर्ला संकुलात येणाऱ्यांची संख्या वाढल्याने बांद्रा ते विरार दरम्यानच्या लोकल फेऱ्या वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
--------
खार ते गोरेगाव सहावी मार्गिका मार्चपर्यंत
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सहाव्या रेल्वे मार्गाचे काम दोन टप्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात खार ते गोरेगाव दरम्यानचा मार्ग मार्च २०२३ पर्यंत तर दुसऱ्या टप्यात गोरेगाव ते बोरीवली मार्ग मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे.