Sat, April 1, 2023

महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्य, अन्नदानवाटप
महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्य, अन्नदानवाटप
Published on : 3 December 2022, 11:09 am
भांडुप, ता. ३ (बातमीदार) ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाणदिनी भांडुप परिसरातून अन्नदान आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दरवर्षी ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयानी येत असतात. त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून भांडुपमधील कार्यकर्त्यांच्या मदतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भांडुप तालुका अध्यक्ष पवन कुमार बोरुडे दरवर्षी अन्नदान करीत असतात. अन्नदानासोबत शैक्षणिक साहित्य वाटप करणे डॉ. बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे बोरुडे यांनी सांगितले.