घरचा सत्कार अविस्मरणीय -- कविता राऊत. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरचा सत्कार अविस्मरणीय -- कविता राऊत.
घरचा सत्कार अविस्मरणीय -- कविता राऊत.

घरचा सत्कार अविस्मरणीय -- कविता राऊत.

sakal_logo
By

शहापूर, ता. ३ (बातमीदार) : शहापूर प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा तीन दिवस मोठ्या उत्साहात पार पडल्या. खेळात जिद्द, चिकाटी, शिस्त फार महत्त्‍वाची असून त्यासाठी मेहनतही तितकीच महत्त्‍वाची असते, असे प्रतिपादन सावरपाडा एक्स्प्रेस म्हणून परिचित असलेल्या धावपटू कविता राऊत यांनी केले. एकलव्य रेसिडेन्सी मॉडेल स्कूल भातसानगर येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या.
गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेत धावणे, भालाफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, खो-खो, हॉलिबॉल, हँडबॉल, कबड्डी या खेळांचा समावेश होता. तीन हजार मीटर धावणे या वैयक्तिक खेळात मुलांमध्ये प्रशांत तांडेल, मुलींमध्ये वैशाली वैजल, सांघिक खेळातील कबड्डी या खेळात १४ वर्षे वयोगटांत मुले आश्रमशाळा मढ, मुलींमध्ये माध्यमिक आश्रमशाळा सावरोली, १७ वर्षे वयोगटात मुलांमध्ये आश्रमशाळा सावरोली, मुलींमध्ये आश्रमशाळा पिवळी, १९ वयोगटात मुलांमध्ये आश्रमशाळा तळवली, मुलींमध्ये आश्रमशाळांनी प्रथम क्रमांक पटकावला. खो-खो या खेळात मुलांमध्ये आश्रमशाळा गोठेघर, मुलींमध्ये आश्रमशाळा सुसरवाडी, १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आश्रमशाळा चिंबीचा पाडा, मुलींमध्ये टाकीपठार, १९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आश्रमशाळा काराव, हॉलिबॉलमध्ये आश्रमशाळा शिरोळ, मुलींमध्ये याच शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आश्रमशाळा शिरोळ, १९ वर्षे वयोगटात मुलांमध्ये झापवाडी, मुलींमध्ये आश्रमशाळा खुटल, हँडबॉलमध्ये १४ वर्षे वयोगटात मुलांमध्ये आश्रमशाळा, पेंढरघोळ, मुलींमध्ये आश्रमशाळा भिनार, १७ वर्षे वयोगटात आश्रमशाळा पेंढरघोळ, मुली आश्रमशाळा सासणे, १९ वर्षे वयोगटात विजयी संघ आश्रमशाळा पेंढरघोळ, मुली आश्रमशाळा टाकीपठार, तर चॅम्पियनशीप आश्रमशाळा तळावली या संघाला देण्यात आली.
या स्पर्धेत ३६ आश्रमशाळेतील दोन हजार १६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रकल्प अधिकारी रंजना किल्लेदार यांनी या स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
घरचा सत्कार अविस्मरणीय
क्रीडा स्पर्धेच्‍या पारितोषिक वितरण समारंभात बालपणीची आठवण सांगताना राऊत म्हणाल्या, की आपल्यासाठी घरचा सत्कार अविस्मरणीय असतो. त्यासाठी तुम्हीही कठोर मेहनत घेणे गरजेचे आहे.