
कारवा देवी मंदिर रस्ता उद्घाटन सोहळा
पडघा, ता. ३ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील देवीभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कारवा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व सुशोभीकरणाच्या कामाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. राहुर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या सावरोली येथील कारवा देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व मंदिर सुशोभीकरणासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले असून, रस्त्याचे व नामफलकाचे अनावरण श्रीफळ वाढवून शिवसेना उपनेते प्रकाश पाटील व आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, शिवसेना कल्याण तालुकाप्रमुख वसंत लोणे, पडघा सोसायटीचे सभापती डॉ. संजय पाटील, मीनाक्षी फाऊंडेशनचे अध्यक्ष विष्णू चंदे, जिल्हा परिषद सदस्य श्रेया गायकर, भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर, सरपंच सरिता पाटील, उपसरपंच मनीषा गुरव, ग्रामसेविका साक्षी शिंदे, शिवसेना विभागप्रमुख सुभाष पाटील, विलास पाटील, योगेश पाटील उपस्थित होते.