गरजूंच्या मदतीसाठी सामर्थ्य सेवाभावी संस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरजूंच्या मदतीसाठी सामर्थ्य सेवाभावी संस्था
गरजूंच्या मदतीसाठी सामर्थ्य सेवाभावी संस्था

गरजूंच्या मदतीसाठी सामर्थ्य सेवाभावी संस्था

sakal_logo
By

मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः गरजूंच्‍या मदतीसाठी साई हिल रोड, टेंभीपाडा भांडुप पश्चिम येथे सामर्थ्य सेवाभावी संस्थेची स्‍थापना करण्यात आली आहे. याबद्दल अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते विवेक सावंत म्हणाले, की समाजसेवा आणि गरजूंना योग्य मदत हा मूळ दृष्टिकोन ठेवून ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल परब, सचिव प्रतीक करावडे आणि खजिनदार पंकज कुबल आहेत आणि कार्यकारिणीमध्ये प्रथमेश शिरसाट आणि नीलेश शिवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सामर्थ्य ही संस्था सुरुवातीला सामाजिक कार्यकर्त्यांचा एक चमू होता आणि तो ७८७८ ग्रुप म्हणून कार्यरत होता; मात्र आता त्याची रीतसर नोंदणी झाली असल्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्यामार्फत राबवण्यात येत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आश्रम पनवेल आणि वाघबिळ (ठाणे) येथे भेट देऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरवणे, गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या वस्तू पुरवणे, आदींचा समावेश आहे. संविधान दिवसाचे औचित्य साधून संस्थेने साईचरित्र पारायणाचे अयोजनदेखील केले होते. याप्रसंगी संस्थेने जीवन ज्योत एस. आर. ए. संस्था आणि नवनीत सदन एस. आर. ए. संस्था यांना प्रत्येकी एक व्हीलचेअर आणि स्ट्रेचरचे वाटप केले.