गृहसंकुलातील पाच वाहने जळून खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहसंकुलातील पाच वाहने जळून खाक
गृहसंकुलातील पाच वाहने जळून खाक

गृहसंकुलातील पाच वाहने जळून खाक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : कल्याण ग्रामीण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हारळ गावातील कुबेर हिल्स या गृहसंकुलामधील आवारात पार्क करून ठेवलेल्‍या पाच दुचाकी जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या वाहनांना आग कशी लागली हे अद्याप उघड झाले नसून, त्याबाबत पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर उभी करण्यात आलेली वाहने अज्ञातांकडून जाळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.