Sun, March 26, 2023

कब्बड्डी चाचणी स्पर्धेमध्ये सेजल पेडामकरची निवड
कब्बड्डी चाचणी स्पर्धेमध्ये सेजल पेडामकरची निवड
Published on : 3 December 2022, 11:43 am
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः नुकत्याच झालेल्या मुंबई नगर जिल्हा चाचणी स्पर्धेत कबड्डी खेळामध्ये कुमारी गटात कांजूरमार्ग, छत्रपती नगरमध्ये राहणारी आणि सत्यम सेवा संघ या मंडळात खेळणारी सेजल पेडामकर हिची मुंबई उपनगरच्या कबड्डी संघात निवड झाली आहे. सेजल हिचा सत्कार भाजपचे कार्यकर्ते किशोर कदम, छत्रपती क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच छत्रपती नगरातील रहिवासी यांच्यातर्फे छत्रपती क्रीडा मंडळाच्या मैदानात करण्यात आला आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी छत्रपती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नयन शेटे, सेक्रेटरी मंगेश घाग आणि इतर अनेक महिला उपस्थित होत्या.