सोनसाखळी चोरांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनसाखळी चोरांना अटक
सोनसाखळी चोरांना अटक

सोनसाखळी चोरांना अटक

sakal_logo
By

धारावी, ता. ३ (बातमीदार) : धारावीतील धोबीघाट परिसरात एका व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी दोन व्यक्तींनी जबरदस्तीने खेचून पळ काढला होता. याबाबत धारावी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव कदम, हवालदार अंगरक, शिपाई चंदनशिवे, गणेश भरगुडे व विजय साळुंखे पथकाने गुप्‍त माहितीच्या आधारे हा तपास केला. यामध्‍ये हसन ऊर्फ नुर मो. शेख उर्फ पाशा, मोहम्मद रफिक हाजी मोहंमद शेख या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली.