अंधेरीत अपंगासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरीत अपंगासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान
अंधेरीत अपंगासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान

अंधेरीत अपंगासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान

sakal_logo
By

जोगेश्‍वरी, ता. ३ (बातमीदार) : जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून अंधेरीत निवासी अपंग व्यक्तींचे विशेष मतदार नावनोंदणी अभियान राबवण्यात आले. अंधेरी पूर्व मतदारसंघाकडून २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत अपंगांसाठी विशेष मतदार मोहीम राबवण्‍यात आली. अंधेरी पूर्वेतील चेशायर होम इंडिया मुंबई स्थितमधील सर्व निवासी अपंगांसाठी ३० नोव्हेंबर रोजी राबविण्‍यात आली; यात ३० जणांनी प्रत्‍यक्ष नाव नोंदणी केली, तर सुमारे १०० लोकांना नवीन नाव नोंदणी व नाव दुरुस्तीच्या अर्जाचे वितरण करण्‍यात आले. अंधेरी पूर्व १६६ अंधेरी पूर्व मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी प्रशांत पाटील, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अजय घोळवे, नायब तहसीलदार नरेश जागकर, नावनोंदणी प्रगणक अविनाश राठोड, सतीश मिटबावकार, राजेश खरात, रवींद्र गोसावी, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी भगवान वेळीस, विनोद सिंग, तसेच चेशायर होमचे प्रमुख प्रकल्प अधिकारी संजय मुंगी उपस्थित होते. या अभियानाला मूकबधिर प्रशिक्षक समन्वयक आकाश निंबाळकर, शेरली अब्राहम, समाजसेविका नमिता गुरव, फातिमा माता सदन प्रमुख सिस्टर मगेजीलिन, सिस्टर आरोग्या आणि स्नेहसदन प्रमुख सिस्टर ग्रेसी यांचे सहकार्य लाभले.