Sat, April 1, 2023

डोंबिवलीत ११ रोजी दिव्यांग सहाय्य शिबिर
डोंबिवलीत ११ रोजी दिव्यांग सहाय्य शिबिर
Published on : 3 December 2022, 11:06 am
डोंबिवली, ता. ३ (बातमीदार) ः भारत विकास परिषद डोंबिवली, चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवली आणि दिलासा ट्रस्ट डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दिव्यांग साह्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांगांना कॅलिपर्स, अत्याधुनिक मॉड्युलर पाय आणि कृत्रिम हात बसवण्यात येणार आहेत. हे शिबिर रविवारी (ता. ११) सकाळी ९ वाजता चंद्रकांत पाटकर, तळमजला, राजाची रोड लेन, ३ डोंबिवली पूर्व येथे पार पडणार आहे.