Fri, March 31, 2023

कुटुंब चालविण्यासाठी लघूउद्योगाची उभारणी
कुटुंब चालविण्यासाठी लघूउद्योगाची उभारणी
Published on : 3 December 2022, 8:33 am
वाडा, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील दिनकरपाडा येथील शेतकरी महिला अपेक्षा चौधरी यांनी राहत्या घरीच महालक्ष्मी लघु उद्योग सुरू केला आहे. घर सांभाळून कुटुंब चालविण्यात पतीला हातभार लागावा यासाठी लघु उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पापड, खारवडी, शेवया यांसारख्या रोजच्या जेवणात समावेश असलेले पदार्थ बनवून त्यांची गाव-खेड्यात विक्री करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. या महालक्ष्मी लघु उद्योगाचे उद्घाटन कोंढले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आर्या देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोंढले ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर रिंजड, जिजाऊ स्पोर्ट्स अॅकेडमीचे प्रमुख अरविंद देशमुख, माधव चौधरी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.