Sat, March 25, 2023

जीवनदीप कॉलेजला पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
जीवनदीप कॉलेजला पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
Published on : 3 December 2022, 11:44 am
टिटवाळा, ता. ३ (बातमीदार) : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील गोवेली येथील जीवनदीप कॉलेजच्या विद्यार्थिनींनी कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. कामिनी बोष्टे आणि काजल भाकरे या दोन्ही मुलींची कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी निवड झाली होती. ही स्पर्धा न्यूझीलँड येथे २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत सुरू आहे. या स्पर्धेत या दोन्ही मुलींनी ७५ किलो वजनी गटात पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य के. बी. कोरे यांनी अभिनंदन केले. या दोन्ही मुली ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहेत.