Wed, March 29, 2023

न्यू इंग्लिश स्कूल शाळा रॅलीत प्रथम
न्यू इंग्लिश स्कूल शाळा रॅलीत प्रथम
Published on : 3 December 2022, 10:56 am
वसई, ता. ३ (बातमीदार) : जागतिक एड्स दिनानिमित्त वसई-विरार महापालिकेच्या वतीन एड्स जनजागृती अभियान अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वसई येथील न्यू इंग्लिश शाळेला उत्कृष्ट रॅलीचे प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले. प्रभात फेरीत वसई शहरातील १५ शाळा व महाविद्यालये सहभागी झाले होते. वसई-विरार महापालिकेतर्फे उत्कृष्ट रॅलीचे आयोजन करणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना पारितोषिके देण्यात आली. प्राचार्या एस. एल. वाझ व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.