Mon, March 20, 2023

वसईतील दाम्पत्य जीडीसी अँड ए परीक्षा उत्तीर्ण
वसईतील दाम्पत्य जीडीसी अँड ए परीक्षा उत्तीर्ण
Published on : 3 December 2022, 11:53 am
विरार, ता. ३ (बातमीदार) : वसईतील पती-पत्नीने शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या जीडीसी अँड ए २०२२ च्या परीक्षेमधे यश प्राप्त केलेले आहे. शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंडळाच्या सभेमध्ये घोषित करण्यात आला. राज्य शासनाच्या सहकार विभागाने जाहीर केलेल्या उत्तीर्ण उमेदवारांच्या यादीत वसईतील उच्चशिक्षित मनीष राणे व पल्लवी राणे या दाम्पत्याचे नाव एकाच वेळी पहिल्याच प्रयत्नात झळकले असल्याने वसईसह पालघर जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे. मनीष व पल्लवी हे दोघेही उच्चशिक्षित असून मनीष हे देशातील नावाजलेल्या बँकेत उच्च पदावर कार्यरत आहेत.