दिव्यांगांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अपूर्व कुलकर्णी यांना प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अपूर्व कुलकर्णी यांना प्रदान
दिव्यांगांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अपूर्व कुलकर्णी यांना प्रदान

दिव्यांगांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अपूर्व कुलकर्णी यांना प्रदान

sakal_logo
By

दिव्यांगांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार अपूर्व कुलकर्णी यांना प्रदान

निसार अली,

जागतिक अपंग दिनानिमित्त भारत सरकारद्वारे दिले जाणारे पुरस्कार दिल्लीस्थित विज्ञान भवन येथे प्रदान करण्यात आले. अपंगत्वावर मात करत आपल्यासारख्या इतरांना जगण्याचे बळ देणाऱ्या मुंबईतील अपूर्व कुलकर्णी यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिव्यांग व्यक्तीला दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार मालाडचे अपूर्व कुलकर्णी यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. व्यावसायिक, शैक्षणिक आणि वैयक्तिक कामगिरीसाठी कुलकर्णी यांना गौरवण्यात आले. वयाच्या सातव्या वर्षी कुलकर्णी यांना गंभीर दृष्टिदोष झाला. तरीही त्यांनी जिद्दीने स्वतःची ओळख निर्माण केली. दृष्य विकलांगता प्राप्त केल्यानंतर, त्याला त्याच्या अभ्यासासाठी वाचक आणि लेखकांवर अवलंबून राहावे लागले. कुलकर्णी यांच्या पालकांनी त्यांच्या शालेय शिक्षणादरम्यान मोलाची भूमिका बजावली. त्यासाठी तासन् तास वाचन करत पाठ्यपुस्तके रेकॉर्ड करण्यात आणि नंतर ती पुस्तके संगणकावर उपलब्ध करण्यासाठी स्कॅन करण्यात घालवली.

केपीएमजीमध्ये पहिला दृष्टी-बाधित चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून काम करणे असो, अमेरिकेच्या प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एबीए प्रोग्राममध्ये पहिला दृष्टी-बाधित भारतीय असो, सर्वच ठिकाणी अपूर्व कुलकर्णी यांनी अपंगत्वावर मात करत आपली ओळख निर्माण केली. कुलकर्णी यांचा ओला ग्रुपमधील पहिला दृष्टी-बाधित कर्मचारी, त्यानंतर राष्ट्रीय संस्थेतील तज्ज्ञ समितीच्या पदांद्वारे धोरण बदलण्यात सहभाग, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघातील कामगिरी असा अपूर्व यांचा प्रवास आहे.


- ओला मोबीलिटी इन्स्टिट्यूट येथे त्यांनी संशोधन प्रमुख म्हणून कार्य केले आहे.
- कुलकर्णी यांनी दिव्यांग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी टेक-सोल्यूशनची संकल्पना मांडली. याबद्दल त्यांना युनायटेड नेशन्स इंडिया आणि एनआययुएद्वारे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
- दिव्यांग महिला आणि पुरुषांच्या अनुभवांवर ‘ऑन द मूव्ह’ हा अहवाल त्यांनी लिहिला. हा अहवाल अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने त्यांनी तयार केला आहे.
- कुलकर्णी यांना युनायटेड नेशन्स, एनआययूए, नीती आयोग, फिक्की, भारतीय उद्योग महासंघ आदी ठिकाणी म्हणणे मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी हाफ मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. तसेच ते उत्कृष्ट सायकलपटूदेखील आहेत.

वाहतूक व्यवस्था ही अर्थव्यवस्थेच्या धमन्या
----------------------------
वाहतूक व्यवस्था ही अर्थव्यवस्थेच्या जीवन धमन्या आहेत, असे अपूर्व कुलकर्णी मानतात. देशाच्या मानवी भांडवलाचे संपूर्ण मूल्य अनलॉक करण्यासाठी सर्वसमावेशक वाहतूक पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून कुलकर्णी अपंग व्यक्तींसह सर्वांसाठी शहरी वाहतूक समावेशक बनवण्यासाठी काम करत आहेत. त्यांना असा भारत पाहायचा आहे- जिथे कोणीही आत्मविश्वासाने, सुरक्षितपणे, परवडणाऱ्या आणि मागणीनुसार उत्स्फूर्तपणे प्रवास करू शकेल.