टॅटूमुळे व्यक्तिमत्वाची छाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॅटूमुळे व्यक्तिमत्वाची छाप
टॅटूमुळे व्यक्तिमत्वाची छाप

टॅटूमुळे व्यक्तिमत्वाची छाप

sakal_logo
By

वाशी ः बातमीदार
जुन्या गोष्टींचे अनुकरण करण्याची मानसिकता सध्या तरुणांमध्ये वाढत आहे. त्यामुळे शरीरावर गोंदवण्याचे (टॅटू) काढण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. एकीकडे युवकांमध्ये टॅटूची क्रेझ वाढत आहे, तर दुसरीकडे या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाची छाप पडत असल्याने अधिक पंसती मिळत आहे.
--------------------------
नवी मुंबईतील गावांमध्ये होणाऱ्या यात्रांमध्ये गोंदण काढतात. प्रचंड प्रमाणात त्रास सहन करून गोंदवायचे; परंतु आता तंत्रज्ञानामुळे आधुनिक पद्धतीने गोंदण रेखाटने फारच सोपे झाले आहे. काही त्रासही सहन करायची गरज नाही. या व्यवसायाला कोरोनाचा प्रचंड प्रमाणात फटका बसल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता टॅटूची हौशी मंडळी पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, तरी देखील काही मंडळीकडून यांची टॅटूची हौस भागवण्यात येत आहे. सध्या २१ ते ३५ वयोगटांतील तरुणांमध्ये टॅटू काढण्याचा कल अधिक आहे.
------------------------------
तात्पुरत्या टॅटूंना अधिक पसंती
टॅटू काढण्यासाठी प्रत्येक इंचाला पैसे द्यावे लागतात. सध्या हात, दंड, मान, मणक्यावर टॅटू काढण्याची क्रेझ वाढली आहे. त्यासाठी ५०० पासून ते २००० पर्यंत पैसे आकारले जातात. कायमस्वरूपीबरोबर तात्पुरते टॅटूही बाजारात मिळतात. प्रत्येक वेळी आपल्याला हवा तो टॅटू तात्पुरत्या स्वरूपात काढून घेता येत असल्याने त्यांना अधिक पसंती दिली जाते.
-----------------------------------------