Mon, March 27, 2023

नवनाथ येथे जलजीवन मिशन योजनेचे भूमीपूजन
नवनाथ येथे जलजीवन मिशन योजनेचे भूमीपूजन
Published on : 3 December 2022, 11:51 am
कासा, ता. ३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गंजाडअंतर्गत महसूल गाव नवनाथ येथे केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण योजनेतील जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन सोहळा आयोजित केला होता. तीन कोटी रुपयांची ही पाणीपुरवठा योजना आहे. हा कार्यक्रम गंजाड ग्रामपंचायतीचे सरपंच अभिजित देसक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपसरपंच कौशल कामडी, सदस्या काशी वायेडा, वनिता हाडळ, निनीता गडग, ग्रामविकास अधिकारी किरण पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाडवी, जिल्हा परिषद सदस्या अमिता घोडा, पंचायत समिती सदस्या सविता धिंडे, भारतीय जनता पक्षाचे डहाणू पूर्व मंडळ चिटणीस प्रवीण वरठा, ग्रामपंचायत कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.