Fri, March 31, 2023

कशेडी घाटात ट्रक पलटल्याने अपघात
कशेडी घाटात ट्रक पलटल्याने अपघात
Published on : 3 December 2022, 1:05 am
पोलादपूर, ता. ३ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई गाव परिसरात ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. लोटे येथील एक्सेल कंपनी ते अहमदाबादपर्यंत सौम्य ॲसिड ड्रम घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एमएच ०५ डीके ४५४१ हा चालक इंजमाम उल हक (वय २३, रा. साकीनाका, मुंबई) हा मुंबई दिशेने जात होता; मात्र घाट मार्गात ट्रकला ब्रेक न लागल्याने तो कडेला पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक सुदैवाने बचावला आहे; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या अपघाताची माहिती समजताच कशेडी महामार्गाचे पोलिस उपनिरीक्षक अनिल चांदणे, यशवंत बोडकर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.