
मध्यरेल्वेची नाताळसाठी विशेष सेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेने हिवाळ्यासह नाताळच्या सुट्ट्यांसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता ४२ विशेष रेल्वे सेवा चालवण्याच्या निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई ते मडगाव, पुणे ते नागपूर, मुंबई ते मंगळूर, मुंबई ते नागपूर आणि पुणे ते अजनी या मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण ४ डिसेंबरला सुरू होईल.
यात ट्रेन क्रमांक ०१४४३ पुणे - अजनी साप्ताहिक एक्स्प्रेस ६ डिसेंबर ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत पुणे येथून दर मंगळवारी दुपारी ४.१५ वाजता सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता पोहोचेल. ०१४४४ विशेष गाडी ७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ पर्यंत बुधवारी अजनी येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. ०१४४९ मुंबई - नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ६ डिसेंबर २०२२ ते ३ जानेवारी २०२३ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी रात्री सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचेल. ०१४५० स्पेशल एक्स्प्रेस ९ डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत नागपूर येथून दर शुक्रवारी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी मध्य रात्री पोहोचेल. ०१४५१ पुणे - नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस ७ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ पर्यंत दर बुधवारी नागपूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचेल. ०१४५२ विशेष एक्स्प्रेस ८ डिसेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ पर्यंत पुणे येथून दर गुरुवारी रात्री सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी मध्य रात्री पोहोचेल. ०१४५३ मुंबई - मंगळूर साप्ताहिक स्पेशल एक्स्प्रेस ९ डिसेंबर २०२२ ते ६ जानेवारी २०२३ पर्यंत दर शुक्रवारी सुटेल आणि मंगळूर जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. ०१४५४ स्पेशल १० डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ पर्यंत मंगळूर जंक्शन येथून दर शनिवारी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचेल. मुंबई - मडगाव साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १ जानेवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. ०१४५६ स्पेशल मडगाव जंक्शन येथून २ जानेवारी रोजी सकाळी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल.