आजपासून चाचा नेहरू बाल महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजपासून चाचा नेहरू बाल महोत्सव
आजपासून चाचा नेहरू बाल महोत्सव

आजपासून चाचा नेहरू बाल महोत्सव

sakal_logo
By

डहाणू, ता. ३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत ४ ते ६ डिसेंबरपर्यंत जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन गिरीवनवासी बालगृह नरेशवाडी येथे करण्यात आले आहे. येथील स्वयंसेवी संस्थांमध्ये असलेल्या अनाथ निराधार मुलामुलींमधील सुप्त गुणांना वाव देऊन सांघिक भावना निर्माण करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.
चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्‌घाटन खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कॉ. विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, विभागीय उपायुक्त महिला व बालविकास कोकण विभाग बापूराव भवाने, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण, सोमय्या ट्रस्टचे अध्यक्ष एस. एस. सोमय्या आदी उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या बाल महोत्सवामध्ये मैदानी खेळ, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, धावणे, गोळा फेक, थाळी फेक, समूह गायन, एकल गायन, एकल नृत्य; तर दुसऱ्या दिवशी इनडोअर गेम्स स्पर्धा, कॅरम, बुद्धिबळ, चित्रकला, वकृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. समारोपाच्या दिवशी अंतिम सामन्याबरोबरच समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेत शासकीय, स्वयंसेवी बालगृहामधील मुलामुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मल्लिनाथ कांबळे यांनी केले आहे.