Tue, March 28, 2023

आता पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील
आता पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील
Published on : 3 December 2022, 3:40 am
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाचा शुभारंभ ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात शनिवारी (ता. ३) सकाळी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे आमंत्रण असताना तेथे न गेलेले बरे, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमांच्या काही तासांपूर्वीच केले. त्यामध्ये मुंब्रा पुलाच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांच्या आठ फूट अंतरावर असताना आपल्यावर ३५४ कलमाचा गुन्हा दाखल झाला, अशी आठवण करून दिली. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलिस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, अशी भीती व्यक्त करताना ‘चलो ये वक्त भी गुजर जायेगा...’ असे ट्विटमध्ये नमूद केलेले आहे.