ब्लॅक लिस्ट वाहनांतून प्रवासी वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लॅक लिस्ट वाहनांतून प्रवासी वाहतूक
ब्लॅक लिस्ट वाहनांतून प्रवासी वाहतूक

ब्लॅक लिस्ट वाहनांतून प्रवासी वाहतूक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः एसटी महामंडळाव्यतिरिक्त खासगी बस वाहतूकदारांना टप्पा वाहतुकीचे अधिकार नाहीत. तरीही सर्रास बेकायदा टप्पा वाहतूक केली जात आहे. त्याशिवाय धक्कादायक म्हणजे मुंबईतून राज्याच्या कानोकोपऱ्यांत धावणाऱ्या प्रवासी वाहतूकदारांकडून वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतर ब्लॅक लिस्ट झालेल्या बस बनावट क्रमांकाचा वापर करून सर्रास प्रवासी वाहतूक करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत राज्यांमध्ये मुंबईतून प्रवासी वाहतूक केली जाते. या वाहतुकीमध्ये सर्वाधिक वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे परिवहन विभागाच्या कारवाई मोहिमेतून उघड झाले आहे. ज्यामध्ये विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालवणे, अवैधरीत्या टप्पा वाहतूक, अवैधरीत्या माल वाहतूक करणाऱ्या बस, योग्यता प्रमाणपत्र नसणे, रिफ्लेक्टर इंडिकेटर टेल लाईट वापर न करणे, वाहनांमध्ये बेकायदा केस फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर न भरलेल्या बस, जादा भाडे आकारणाऱ्या बस, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या बस आणि अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाने आॅक्टोबर महिन्यात कारवाई केली असून राज्यभरात १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबरदरम्यान १५ हजार ६५१ खासगी बस दोषी ठरल्या आहेत. त्यानंतरही अद्यापही दोषी ठरलेल्या बस रस्त्यांवर सर्रास प्रवासी वाहतूक करत आहेत.
...
एम परिवहन ॲपवर ब्लॅक लिस्ट
अनेक बसची शासनाच्या एम परिवहन ॲपवर आॅनलाईन चौकशी केल्यास अनेक बस ब्लॅक लिस्ट केल्याचे स्टेटस दिसून येत आहे. मात्र त्याच बस रस्त्यांवर धावताना बनावट क्रमांकाचा वापर करत असल्याची माहिती ‘सकाळ’च्या हाती लागली आहे. यामध्ये सर्वाधिक बस नाशिक, पुणे मार्गाने विदर्भ, मराठवाड्यात धावणाऱ्या असल्याचेही पुढे आले असल्याने या बेकायदा प्रवासी वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जात आहे.
...
बनावट क्रमांक वापरून प्रवासी वाहतूक करणे धोक्याचे आहे. त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
- विवेक भीमनवार, आयुक्त, परिवहन विभाग
...