२०० विद्यार्थ्यांकडून भगवदगीता पठण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२०० विद्यार्थ्यांकडून भगवदगीता पठण
२०० विद्यार्थ्यांकडून भगवदगीता पठण

२०० विद्यार्थ्यांकडून भगवदगीता पठण

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : गीता जयंतीनिमित्त उल्हासनगरातील श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशवंत विद्यालयात २०० विद्यार्थ्यांचा एकाच वेळी भगवदगीतेच्या सामूहिक पठणाचा आवाज गुंजला. गीता जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम ठिकठिकाणी राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे कॅम्प नंबर ४ परिसरात असलेल्या यशवंत विद्यालयात गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला वेदांताचार्य महंत १०८ श्री स्वामी विवेकानंद गिरीजी महाराज, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास चौधरी, दिलीप सपकाळ, प्रेमलता नेहते, राजेश भंगाळे, मुख्याध्यापक भाऊसाहेब सावंत, प्रमोद नेहते, नवनीत बऱ्हाटे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. यावेळी प्राथमिक विभागातील सहावीमध्ये शिकणाऱ्या राहुल सोनावणे या विद्यार्थ्याने श्रीकृष्णाचा वेश परिधान करत भगवदगीतेचा दहावा अध्याय म्हटला. तसेच त्याच्यासोबत उपस्थित विद्यार्थ्यांनी भगवदगीतेच्या दहाव्या अध्यायाचे सामूहिक पठण केले.