शहापूर तालुक्यात २५ लाखांची वीजचोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर तालुक्यात २५ लाखांची वीजचोरी
शहापूर तालुक्यात २५ लाखांची वीजचोरी

शहापूर तालुक्यात २५ लाखांची वीजचोरी

sakal_logo
By

शहापूर, ता. ४ (बातमीदार) : महावितरणच्या भरारी पथकाने तालुक्यातील विविध ठिकाणी नोव्हेंबरमध्ये टाकलेल्या धाडीत २५ लाखांहून जास्त रकमेच्या विजेची चोरी झाल्याचे समोर आले आहे. शहापूर तालुक्यातील शहापूर, आसनगाव, आवरे, वासिंद, कसारा, धसाई, पाली, शिलोतर, पेंडरघोळ आदी ठिकाणच्या ६४ ग्राहकांवर भरारी पथकाने धाडी टाकून कारवाई केली. दोन लाख तीन हजार ५७३ युनिटची चोरी उघडकीस आली. वीजचोरीची बिले देऊनही ज्यांनी ती भरली नाहीत, अशा ग्राहकांवर मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ग्राहकांनी लवकरात लवकर बिले भरावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले; तर खंडित केलेला विद्युतपुरवठा स्वतःहून चालू करणाऱ्या ग्राहकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही महावितरणतर्फे देण्यात आला आहे.