साहित्य चावडीवर रंगली शांत बाईंच्या गाण्याची मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्य चावडीवर रंगली शांत बाईंच्या गाण्याची मैफल
साहित्य चावडीवर रंगली शांत बाईंच्या गाण्याची मैफल

साहित्य चावडीवर रंगली शांत बाईंच्या गाण्याची मैफल

sakal_logo
By

विरार, ता. ४ (बातमीदार) : कवी शांताबाई शेळके यांची अनेक गाणी अजरामर आहेत. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असून हा धागा पकडून विरार येथील यंगस्टार ट्रस्टच्या माध्यमातून सरू असलेल्या साहित्य चावडीवर शांताबाई शेळके यांच्या गाण्यांची मैफल रंगली. साहित्य चावडीच्या सरपंच म्हणून सुमंगला इंगोले यांनी काम पाहिले. ज्येष्ठ साहित्यिका, पत्रकार, बालसाहित्य, कथाकार अशा वेगवेगळ्या प्रकारचे साधे सरळ लेखन करून मनामनांत घर करणाऱ्या शांताबाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रेरणेने व समन्वयक अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य चावडीवर मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शांतबाईंची ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘वादळ वारं सुटलं गं’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘हिची चाल तुरुतुरु’, ‘ऋतू हिरवा’, ‘काटा रुते कुणाला’ यांसारखी गाणी रसिकांना पुन्हा एकदा जुने दिवस आठवायला लावत होती. कार्यक्रमात मृणालिनी चव्हाण, शैलजा कानडे, नमिता दिवेकर, विक्रांत केसरकर, रश्मी लुकतुके असे २५ गायक सहभागी झाले होते. कार्यक्रम सुरू असताना तिथे एक मांजर आली, तिने शिरा खाल्ला आणि व्यासपीठावर जाऊन बसली, सर्वांचे लक्ष तिने वेधून घेतले होते.