जिल्ह्यातील धरणांची सुरक्षा वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील धरणांची सुरक्षा वाऱ्यावर
जिल्ह्यातील धरणांची सुरक्षा वाऱ्यावर

जिल्ह्यातील धरणांची सुरक्षा वाऱ्यावर

sakal_logo
By

कासा, ता. ४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प व लघु पाटबंधारे योजनेच्या सुरक्षा रक्षकांची सेवा १ डिसेंबरपासून खंडित करण्यात आली आहे. यामुळे धामणी व कवडास धरणाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. ही दोन्ही धरणे अति महत्त्वाची असून याद्वारे वसई-विरार, डहाणू, बोईसर या भागात पाणी पुरवले जाते. त्याचबरोबर कालव्याद्वारे शेती सिंचनासाठी पाणी पुरविले जाते, पण यावर असणाऱ्या सुरक्षा महामंडळाने पुरवलेल्या प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची सेवा १ डिसेंबरपासून अचानक खंडित केल्याने धरणाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
या सुरक्षा रक्षकांचे वेतन २०२१-२२ च्या कालावधीत मंजूर प्रापनसूचीमध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून उपलब्ध करण्यात येत होते. नोहेंबर २०२२ नंतर या विभागाच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प व योजनांवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठी तरतूद नसल्याने त्यांची सेवा १ डिसेंबरपासून बंद करण्याचे पत्र पाटबंधारे विभागाने पाठवल्याने धरणाची सुरक्षा राम भरोसे झाली आहे. २०२२-२३ मध्ये वेतनाची तरतूद आहे; पण प्रापनसूची मंजूर झाल्यानंतरच पुन्हा प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांचा पुरवठा केला जाईल, असेदेखील कळवण्यात आले आहे. या बाबतीत पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गास संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

...........................
आम्ही जवळपास २१ सुरक्षा रक्षक धामणी व कवडास धरणावर सेवा करत आहोत, पण अचानक सेवा खंडित केल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमची सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी आम्ही पाटबंधारे विभागाकडे केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही येथे काम करीत आहोत.
- नंदू डोकंफोडे, सुरक्षा रक्षक, कवडास