संजय निमसे, नंदू मोगरे यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय निमसे, नंदू मोगरे यांची निवड
संजय निमसे, नंदू मोगरे यांची निवड

संजय निमसे, नंदू मोगरे यांची निवड

sakal_logo
By

खर्डी, ता. ४ (बातमीदार) : राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष व ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती संजय निमसे यांची बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या शहापूर विधानसभा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. तसेच नंदकुमार मोगरे यांची शहापूर तालुका प्रमुखपदी निवड झाल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला शनिवारी सोडचिठ्ठी देऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सध्या तालुका स्तरावर नेतृत्व करणाऱ्या मारुती धिर्डे यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, संपर्कप्रमुख आकाश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.