महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात
महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात

महामार्गावर एकाच दिवशी दोन अपघात

sakal_logo
By

कासा, ता.४ (बातमीदार) : मुंबई अहमदाबाद महामार्गावर शनिवारी दोन अपघात झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघात ग्रस्त वाहने बाजूस घेत वाहतूक कोंडी सोडविली.
महामार्गावर महालक्ष्मी येथे मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो ट्रकला धडक दिली. यात टेम्पो चालक रामसुरत यादव यास दुखापत झाली असून त्याला रूग्णालयात दाखल केले. तर येथूनच काही अंतरावर असलेल्या धानिवरी पुलावर पिकअप टेम्पोचा टायर फुटला. तो पिकअप तेथेच उभा करून वाहन चालक राजू यादव नविन टायर आणण्यास जात असताना पाठीमागून जोरदार वेगात आलेल्या कंटेनरने या पिकअप ला धडक दिली. या दोन्ही अपघातांत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.