ठाणावाला मराठी तरुणांची इराणी झेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणावाला मराठी तरुणांची इराणी झेप
ठाणावाला मराठी तरुणांची इराणी झेप

ठाणावाला मराठी तरुणांची इराणी झेप

sakal_logo
By

ठाणे, ता. ४ : बन मस्का पाव, गरमागरम चहा आणि सोबतीला खिमा पाव, मावा केक. एके काळी मुंबईकरांना भुरळ घालणारी इराणी हॉटेल्स काळाच्या ओघात ‘हरवत’ चालली आहेत. असे असताना ठाण्यात मात्र पहिलेवहिले इराणी कॅन्टीन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे पारशी समुदायाची ओळख असलेले इराणी कॅन्टीन सुरू करण्याचे धाडस ठाण्यातील पाच उच्चशिक्षित तरुणांनी केले आहे.
बैठकीच्या व्यवस्थेपासून ते खास चवीपर्यंत सबकुछ हुबेहूब करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. म्हणूनच हॉटेलचे नाव ठेवतानाही त्यांनी स्वतःची ओळख ‘ठाणावाला’ अशी सांगितली आहे. कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. आता कोरोनाची पीछेहाट होत असली, तरी बेकारीचा प्रश्न तरुणांसमोर तसाच आहे. त्यातही नोकरीपलीकडे स्वतःचा तेही हॉटेल व्यवसायात उतरण्याचा विचार मराठी तरुण फार करताना दिसत नाहीत, पण ठाण्यातील पाच तरुणांनी या व्यवसायात उडी घेत ठाण्याला पहिले इराणी हॉटेल दिले आहे. प्रीतिश धारुरकर, देवांग गोळे, राजस साबदे, अमय धाडवे आणि वेदांत पाटील अशी या तरुणांची नावे आहेत. बीई मेकॅनिकल, बीएमस, एमबीए केलेले हे तरुण काही तरी हट के करण्यासाठी एकत्र आले. त्यातूनच मस्त शोर्माजीचा जन्म झाला. लहान मुलांपासून ते वयस्कांपर्यंत सध्या सर्वांच्या जिभेवर शोर्माची चव रेंगाळत आहे. ठिकठिकाणी हातगाड्यांवर विकल्या जाणाऱ्या या शोर्माला कॉर्नरचे स्वरूप त्यांनी दिले. पहिले कॉर्नर ठाण्याच्या हरिनिवास भागात सुरू करण्यात आले. त्यानंतर त्याच्या दादरपर्यंत शाखा विस्तारल्या.