चैत्यभूमीवर गजबजतेय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चैत्यभूमीवर गजबजतेय!
चैत्यभूमीवर गजबजतेय!

चैत्यभूमीवर गजबजतेय!

sakal_logo
By

मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे अनुयायी येण्यास सुरुवात झाली आहे. दादरमधील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसर पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह विक्रेत्यांनी गजबजू लागला आहे. पुढील तीन-चार दिवसांत ८ ते १० लाख अनुयायी चैत्यभूमीला भेट देण्याचा अंदाज आहे. अनुयायांसाठी पालिकेनेही जय्यत तयारी केली आहे.
चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह यासह आवश्यक त्या ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती  परिमंडळ दोनचे उपआयुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे. 
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्‍यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्‍मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्‍‌या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आले आहे. तसेच आपत्‍कालीन परिस्थितीत तात्‍पुरत्‍या निवाऱ्‍‌याची सोय म्‍हणून या परिसरातील महापालिकेच्‍या ६ शाळा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्‍यक त्‍या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्‍यात आल्‍या आहेत, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली. 
महापालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वेस्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

अशा आहेत सुविधा : 
• चैत्‍यभूमी येथे शामियाना व व्‍हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्षाची व्‍यवस्‍था.

• चैत्‍यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या ३ ठिकाणी रुग्‍णवाहिकेसहीत आरोग्‍यसेवा.

• १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्‍या मंडपात तात्‍पुरता निवारा.

• छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व परिसरात पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये.

• रांगेतील अनुयायांसाठी पुरेशा संख्येतील फ‍िरती शौचालये.

• पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था.

• पिण्‍याचे पाणी असणाऱ्‍‌या टँकरचीही व्यवस्था.

• संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्‍था.

• अग्निशमन दलामार्फत आवश्‍यक ती सेवा.

• चौपाटीवर सुरक्षा रक्षकासहित बोटींची संपूर्ण परिसरात व्‍यवस्‍था.

• मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.

• फेसबुक, ट्विटर, यू-ट्युब या समाजमाध्यमांवर असणाऱ्‍‌या मुंबई महापालिकेच्या अधिकृत खात्यांद्वारे ६ डिसेंबर रोजी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था. 

• विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्‍टॉल्सची रचना.

• दादर (पश्चिम) रेल्‍वेस्‍थानकाजवळ आणि एफ उत्तर, चैत्‍यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर (पूर्व) स्‍वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष.

• राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.

• स्‍काऊट गाईड हॉल येथे भिक्‍कू निवासाची व्‍यवस्‍था.

• मैदानात धुळीचा त्रास रोखण्‍यासाठी पायवाटांवर आच्छादनाची व्‍यवस्‍था.

• अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीचे चैत्‍यभूमी परिसर येथे निदर्शक फुग्‍याची व्‍यवस्‍था.

• भ्रमणध्वनी चार्जिंगकरीता शिवाजी पार्क येथे पॉइंटची व्‍यवस्‍था.

• फायबरच्‍या तात्‍पुरत्‍या स्‍नानगृहाची व तात्‍पुरत्‍या शौचालयांची पुरेशा संख्येने व्‍यवस्‍था.

• रांगेतील अनुयायांसाठी तात्‍पुरते छत असलेल्‍या बाकड्यांची व्‍यवस्‍था.

• छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व्‍यतिरिक्‍त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्‍य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथे देखील तात्‍पुरत्‍या निवाऱ्‍यांसह पुरेशा संख्येने फि‍रती शौचालये.

• स्‍नानगृहे व पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था.