ठाणे पोलिसांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त चोख बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पोलिसांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त चोख बंदोबस्त
ठाणे पोलिसांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त चोख बंदोबस्त

ठाणे पोलिसांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त चोख बंदोबस्त

sakal_logo
By

ठाणे, ता. ४ (वार्ताहर) : महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ठाणे शहरात कोर्ट नाका आणि ठाणे स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात येते. शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहणारे फलक, बॅनर, तसेच कॅंडल मार्चसह मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून ठाणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळात नियोजित बंदोबस्तासह दोन उपायुक्त आणि दोन सहायक पोलिस आयुक्त यांची अतिरिक्त कुमक बंदोबस्तात लावण्यात आलेली आहे. ३०० पुरुष अंमलदारांसह २०० महिला अंमलदारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त २०० महिलांसह ५०० होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय गुन्हे शाखेची पथके, विशेष शाखेची कुमक आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती ठाणे विशेष शाखेचे सहायक आयुक्त यांनी सांगितले. दादर येथील चैत्यभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने रेल्वे प्रवास करतात. त्यामुळे स्थानकात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिस कार्यरत राहणार आहेत.

ठाणे शहरात निघणाऱ्या मिरवणुकांवर नियंत्रण ठेवत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिस कार्यरत राहणार आहेत.
- डॉ. विनयकुमार राठोड, उपआयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर