भिवंडीत गीताजयंती उत्सव उत्‍साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत गीताजयंती उत्सव उत्‍साहात
भिवंडीत गीताजयंती उत्सव उत्‍साहात

भिवंडीत गीताजयंती उत्सव उत्‍साहात

sakal_logo
By

भिवंडी, ता. ५(बातमीदार) : मोक्षदा एकादशीच्‍या निमित्ताने शहरातील नवभारत इंग्लिश मीडियम शाळेत श्रीमद् भगवद्गीता जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात जवळजवळ १५० विद्यार्थी व शिक्षक, तसेच टिळक चौक मित्र मंडळाचे अनेक सदस्य सहभागी झाले होते. उपस्थित सर्वांचे गंधार्चन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीव्यास महर्षी, श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा व श्रीमद् भगवद्गीतेचे पूजन झाले. त्‍यानंतर रामदास पाटील, शीतल देशमुख व मनीषा वडके यांनी गीतेतील निवडक श्लोकांचे सामुदायिक पठण केले. आर. डी. देसाई यांनी संस्कृत भाषा व श्री भगवद्गीता माहात्म्य कथन केले. तसेच किरण वानखेडे व वैशाली गोडसे यांनी श्रीकृष्ण स्तुतीपर गीते सादर केली.
या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णार्जुनांचे आकर्षक चित्र रंगवले होते. सूर्यकांत बल्लेवार यांनी महर्षी व्यासांचे उत्कृष्ट पोर्ट्रेट तयार केले.