भांडुपमध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भांडुपमध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धा
भांडुपमध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धा

भांडुपमध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धा

sakal_logo
By

भांडुप, ता. ५ (बातमीदार) ः भांडुप पश्चिम परिसरातील आदर्श विद्यालय हायस्कूलचे अध्यक्ष विजय माने, कार्यकारी अध्यक्ष शशिधरण नायर यांनी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धा ४ ते १० डिसेंबरदरम्‍यान आदर्श विद्यालय हायस्कूल पटांगण आणि प्रमोद महाजन पटांगण टॅंक रोड येथे भरवण्यात आल्‍या आहेत. यामध्‍ये कराटे, बुद्धिबळ, कबड्डी, कॅरम, खो-खो, बॉक्स क्रिकेट या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व सहभागी खेळाडूंना कृष्णन सदानंदन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष संजीवकुमार सदानंदन यांच्यामार्फत प्रमाणपत्र व विजयी खेळाडूला रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.