
धारावीत दोन चोरांना अटक
धारावी, ता. ५ (बातमीदार) : धारावीतील भारतीय चाळ, ढोरवाडा येथील रहिवासी संजय परमार व नागजी हे दोघे भाऊ महात्मा गांधी रस्त्यावरून जात असताना सतीश याने नागजी यास प्रथम हाताने मारहाण केली. त्यानंतर सूरज त्याचा भाऊ अनिकेत व त्यांचा मित्र सतीश याने चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम १८०० रुपये व १६०० रुपये गुगल पेवरून जबरदस्तीने पेड करून घेतले. याबाबत धारावी पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल होताच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून गुन्ह्यातील आरोपींची ओळख काढून या आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीअंती गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला. त्यांच्याकडून रोख रुपये १९०० जप्त करण्यात आले. ही कामगिरी धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर, पोलिस निरीक्षक विकास भारमल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय खंडागळे, वैभव कदम, पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव या पथकाने केली.