कलाशिक्षकांचा पवित्र पोर्टलमध्ये समावेश करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कलाशिक्षकांचा पवित्र पोर्टलमध्ये समावेश करा
कलाशिक्षकांचा पवित्र पोर्टलमध्ये समावेश करा

कलाशिक्षकांचा पवित्र पोर्टलमध्ये समावेश करा

sakal_logo
By

कासा, ता. ५ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या पवित्र पोर्टलमध्ये कला शिक्षकांच्या पदाचा उल्लेख करूनच भरती प्रक्रिया राबवावी, यासह इतर मागण्यांचे निवेदन पालघर जिल्हा कलाध्यापक संघातर्फे शिक्षणमंत्री व शिक्षण उपसंचालक यांना देण्यात येणार आहे. जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष रुपेश वझे व कार्याध्यश महेंद्र पवार, सचिव नितीन जैतकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन तयार करण्यात आले आहे. सध्याच्या पवित्र पोर्टलमध्ये कला शिक्षकांच्या पदाचा उल्लेख करून सेवक संच निश्चिती व्हावी, शास्त्रीय कला, क्रीडा, संगीत नाट्य या विद्यार्थ्यांच्या प्रस्तावाला लागू केलेले अतिरिक्त शुल्क रद्द करावे, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेला लाखोंच्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट होत असूनही कलाशिक्षकांच्या पदभरतीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे, आदी विषय या निवदेनाद्वारे मांडण्यात येणार आहेत.