शाहिरा केशर जैनूू चांद यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाहिरा केशर जैनूू चांद यांचे निधन
शाहिरा केशर जैनूू चांद यांचे निधन

शाहिरा केशर जैनूू चांद यांचे निधन

sakal_logo
By

धारावी, ता. ५ (बातमीदार) : लोकशाहीर कॉ. अमर शेख यांच्या कलापथकातील सहकारी शाहिरा केशर जैन चांद यांचे सोमवारी (ता. ५) पहाटे २ वाजता, सात रस्ता (महालक्ष्‍मी) येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा शाहीर निशांत, सून, नातवंडे असा परिवार आहे.
शाहिरा केशर जैनू चांद यांनी लोकशाहीर कॉ. अमर शेख, लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्यासोबत व पती शाहीर जैनू चांद यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, गिरणी कामगारांच्या चळवळीत, तसेच सांस्कृतिक प्रबोधनाचे मोठे कार्य केले होते. अलीकडेच लोकशाहीर कॉ. अमर शेख यांच्या स्मृतिदिनी शिवाजी मंदिर येथे दलित पँथर सुवर्णमहोत्सव समितीतर्फे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून विशेष सत्कार करण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी अण्णा भाऊ यांनी त्यांच्यासाठी लिहिलेले खास गाणे गाऊन लोकप्रशंसा मिळवली होती. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी, समतावादी सांस्कृतिक चळवळीचा दुवा निखळला आहे. त्यांना दलित पँथर सुवर्णमहोत्सव समिती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, लोक सांस्कृतिक मंच, जातीअंत संघर्ष समिती, जनवादी लेखक संघ, प्रगतिशील लेखक संघ आदी संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. वरळीच्या माता रमाबाई आंबेडकर स्मशानात बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.