खारघर दारूमुक्तीचा प्रश्न सरकारदरबारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर दारूमुक्तीचा प्रश्न सरकारदरबारी
खारघर दारूमुक्तीचा प्रश्न सरकारदरबारी

खारघर दारूमुक्तीचा प्रश्न सरकारदरबारी

sakal_logo
By

खारघर, ता. ५ (बातमीदार) : शहराच्या दारूमुक्तीसाठी लढा सुरू आहे. पनवेल महापालिकेने पारित केलेल्या ठरावामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे दारूमुक्ती विषयाच्या नियमावलीची माहिती घेऊन खारघर दारूमुक्त असावे यासाठी आता राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली जाणार आहे. त्यामुळे खारघर शहराच्या दारूमुक्तीवर आता सरकारदरबारी तोडगा निघण्याची शक्यता आहे.
खारघर शहर दारूमुक्त असावे यासाठी खारघरमधील रहिवासी गेल्या पंधरा वर्षांपासून लढा देत आहेत. खारघरमध्ये सुरू झालेले श्याम वाईन हे दुकान खारघरवासीयांच्या एकजुटीमुळे बंद करावे लागले. अशातच महिनाभरापूर्वी खारघर सेक्टर दहामध्ये निरसुख पॅलेस बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी देण्यात आली. त्यामुळे खारघरमधील निरसुख पॅलेस बार तसेच पूर्वीपासून सुरू असलेला अजित पॅलेस बंद करण्यासाठी खारघरवासीयांनी आंदोलनाबरोबरच सरकारदरबारी लढा सुरू केला आहे. याच अनुषंगाने नियोजन केले जात असून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची यासंबंधी नुकतीच भेट घेऊन निवेदन दिले आहे. या वेळी ठाकूर यांनी दारूबंदीविषयी शासनाचे धोरण, नियमावलीचा अभ्यास करून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले आहे.
-------------------------------
खारघर दारूमुक्त असावे यासाठी पालिका प्रशासनाचे ध्येयधोरण काय आहे. दारूबंदीविषयी मतदान तसेच पालिकेच्या प्रभाग विभागाची सीमारेषा याविषयी सखोल चर्चा करून खारघर दारूमुक्त असावे, यासाठी प्रयत्न केला जाईल.
- प्रशांत ठाकूर, आमदार