Tue, Feb 7, 2023

‘अंबिस्ते बंधाऱ्याजवळील रस्ता दुरुस्त करा’
‘अंबिस्ते बंधाऱ्याजवळील रस्ता दुरुस्त करा’
Published on : 5 December 2022, 10:48 am
कासा, ता. ५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील अंबिस्ते येथील डहाणू व पालघर तालुक्याच्या हद्दीवर सूर्या नदीवर बनवलेल्या बंधाऱ्यावरून बोईसर औद्योगिक केंद्रात कामासाठी अनेक तरुण जात असतात. पण या रस्त्याची दुरवस्था झाली असून त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अंबिस्ते येथील बंधाऱ्यावरून जाणाऱ्या रस्त्याने डहाणू तालुक्यातील अनेक तरुण रोजगारासाठी जाण्यासाठी बोईसर औद्योगिक वसाहतीत कामानिमित्त जातात. पण बंधाऱ्यापासून दोन्ही बाजूचा रस्ता खराब झाल्याने मोठा त्रास होतो. या बंधाऱ्याचा वापर सारणी, उर्से, म्हसाड, साये, अंबिस्ते, येथील ग्रामस्थ करीत असतात. त्यामुळे बंधाऱ्याजवळून जाणारा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे केली आहे.