पं. मराठे महोत्सव निश्चितच कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पं. मराठे महोत्सव निश्चितच कौतुकास्पद
पं. मराठे महोत्सव निश्चितच कौतुकास्पद

पं. मराठे महोत्सव निश्चितच कौतुकास्पद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : तबला-मृदंगावर थिरकणारी बोटे, बासरी-व्हायोलिनमधून निघणारे सूर, संतूर वादनाची साथ, कथ्थक नृत्याचा ठेका आणि ‘सौभद्र’ या संगीत नाटकाला मिळालेली रसिकांची उत्स्फूर्त दाद घेत कलावंतांनी संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाच्या मैफलीचे समारोपाचे पुष्प गुंफले. पं. राम मराठे यांच्या नावाने हा महोत्सव ठाणे महापालिका करीत असून हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उद्‍गार संतूरवादक पद्मश्री पं. सतीश व्यास यांनी काढले.

ठाणे महापालिका आयोजित संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाचे आयोजन २ ते ४ डिसेंबर २०२२ या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. समारोह सोहळ्यास ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त प्रशांत रोडे व माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सवाला ठाणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शास्त्रीस संगीतातील नामवंत कलावंतांची कला नागरिकांना पाहायला मिळाली. यापुढेही ठाण्यातील कलावंतांच्या माध्यमातून देश-विदेशातील कलावंतांच्या कलेचा आविष्कार ठाणेकरांना पाहायला मिळेल, यासाठी निश्चितच ठाणे पालिका प्रयत्न करेल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात निधी प्रभू यांच्या कथ्थक नृत्याने करण्यात आली. निधी प्रभू यांनीही रसिकांची विशेष दाद मिळवली; तर कल्याणी साळुंखे यांनी सादर केलेल्या शास्त्रीय गायनाने या मैफलीत अधिकच रंगत आणली.

दुसऱ्या सत्रात गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट, पुणे प्रस्तुत आणि मराठी रंगभूमी पुणे निर्मित सादर करण्यात आलेल्या ‘संगीत सौभद्र’ या संगीत नाटकाची मेजवानी रसिकांना मिळाली. ख्यातनाम संतूरवादक दिवंगत पं. शिवकुमार शर्मा यांना संतूर, तबला, बासरी, व्हायोलिन, मृदंगम यांच्या जुगलबंदीने आगळीवेगळी संगीतमय आदरांजली वाहण्यात आली. संतूरवादक पद्मश्री पं. सतीश व्यास, तबलावादक पं. मुकुंदराज देव, बासरीवादक पं. विवेक सोनार, व्हायोलिनवादक अम्बी सुब्रह्मण्यम, मृदंगवादक राजेश श्रीनिवासन या कलाकाराने सादर केलेल्या जुगलबंदीने ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.