Thur, Feb 2, 2023

सांताक्रुझमध्ये दोन गटात हाणामारी
सांताक्रुझमध्ये दोन गटात हाणामारी
Published on : 5 December 2022, 4:43 am
मुंबई, ता. ५ : सांताक्रूझ परिसरात एका अल्पवयीन मुलाने ४५ वर्षीय व्यक्तीला सायकलने धडक दिल्याने दोन गट एकमेकांशी भिडल्याची घटना रविवारी (ता. ४) रात्री घडली. धडकेनंतर व्यक्तीने मुलाला मारहाण करत सायकल आपल्या ताब्यात घेतली. या मुलाने घरी जाऊन घटनेची माहिती वडिलांना दिल्यानंतर त्यांनी इतरांसह घटनास्थळी जाऊन मुलाला मारणाऱ्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर ४५ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या समर्थकांनी मुलाच्या गटाच्या सदस्यांना मारहाण करत दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही गटांच्या सदस्यांवर गुन्हे दाखल केले. यात मुलाला मारहाण करणाऱ्याला अटक करण्यात आली असून, मुलाचे वडील फरार आहेत.