
पश्चिम रेल्वेतर्फे विशेष सोयीसुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर अनुयायांची दादर रेल्वेस्थानकात गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेनेही खबरदारी घेतली आहे. प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी दादर रेल्वेस्थानकात मदत कक्ष उभारण्यात आला आहे. शिवाय स्थानकात चैत्यभूमी आणि राजगृह स्मारक दिशादर्शक फलक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत असणार आहेत. स्थानकाबाहेर आगमन, बाहेर पडण्याची ठिकाणे यासह इतर बाबींबाबत सूचना फलक लावण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकावर आरपीएफ आणि जीआरपीचे ४५० कर्मचारी तैनात असणार आहेत. नागरिकांना मार्गदर्शनासाठी मेगाफोनद्वारे घोषणा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना कारण्यासाठी रेल्वे निरीक्षकांची टीम उपलब्ध असणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
इतर सुविधा
- अतिरिक्त तिकीट काऊंटर
- पिण्याचे पाणी, खाण्याची व्यवस्था
- अतिरिक्त शौचालय व्यवस्था
- फलाट पाचच्या बाजूला पार्किंग
- लिफ्ट-एस्केलेटर चालविण्यासाठी कर्मचारी
- दादर स्थानकात २४ तास वैद्यकीय सुविधा
- पोर्टेबल मेडिकल किटसह रुग्णवाहिका