
चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला जवामाकडून मारहाण
वसई, ता. ५ (बातमीदार) : नालासोपारा पूर्वेकडील संतोषभूवन नाका येथील पांडे चाळीमध्ये आदम शेरमोहम्मद खान याने २९ नोव्हेंबर रोजी चोरी करण्यासाठी घराची कडी तोडत असताना त्याला नागरिकांनी पाहिले. त्यानंतर त्याला जमावाकडून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदर जमावातील व्यक्तींनी तात्काळ पोलिसांना न सांगता मारहाण केल्याने पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. तसेच चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी आदम खान खाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात मुंबईतील कांदिवली पोलिस ठाण्यात खून, दरोड्याचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, घरफोडी करणे, जबरी चोरी करणे, दुखापत करणे, चोरी करणे, बलात्कार असे १३ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तलयाकडून देण्यात आली.