घणसोलीतील मैदानाकडे मुलांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीतील मैदानाकडे मुलांची पाठ
घणसोलीतील मैदानाकडे मुलांची पाठ

घणसोलीतील मैदानाकडे मुलांची पाठ

sakal_logo
By

घणसोली, ता. ७ (बातमीदार)ः सेक्टर ७ येथील भूखंड क्रमांक १३ वरील कै. संजय बालाजी पाटील क्रीडांगणाची अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या मैदानाची दुरवस्था झाली असून गैरसोईंमुळे परिसरातील मुलांनी उद्यांनाकडे पाठ फिरवली आहे.
सेक्टर ७ येथील कै. संजय बालाजी पाटील मैदानाची दुरवस्था झाली असून आता या मैदानाकडे खेळाडूंनी पाठ फिरवली आहे. या मैदानाच्या सुरक्षेसाठी मैदानाच्या बाजूने लावण्यात आलेले लोखंडी कुंपण तुटले असल्याने रात्रीच्या वेळेस हे मैदानात नशेखोरांसाठी मोक्याचे ठिकाण ठरत आहे. या मैदानात असलेल्या गवतामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असून यामध्ये दारूचे ग्लास, गुटख्याची पाकिटे, दारूच्या बाटल्या पडल्या आहेत. यामुळे क्रीडाप्रेमी, नागरिकांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.
-----------------------------
धार्मिक कार्यक्रमांचे केंद्र
घणसोलीतील मैदानात विविध सामने होत असतात. त्याचबरोबर कीर्तन समारंभ, सप्ताह यासारखे धार्मिक कार्यक्रमदेखील या मैदानात पार पडतात. त्यामुळे विविध वयोगटाची व्यक्ती या मैदानात येत असते; पण मैदानात होणाऱ्या दारूच्या पार्ट्यांमुळे गालबोट लागत असून स्वच्छ नवी मुंबईच्या संकल्पनेलाही हरताळ फासला गेला आहे.
--------------------------
भूखंड क्रमांक १३ वर स्थित असलेले कै. संजय बालाजी पाटील मैदानाची सफाई तातडीने केली जाईल. उद्यानांचे तुटलेले कुंपण बसवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
- रमेश गुरव, उपअभियंता, अभियांत्रिकी विभाग
---------------------------------------------------
या मैदानात अनेकदा दारूच्या पार्ट्या होतात. मैदानाचे कुंपण तुटल्याने रात्रीच्या वेळी मद्यपींचा येथे वावर असतो. त्यामुळे उद्यानात जाता येत नाही.
- नितीन भालेराव, नागरिक