अनगावात शिक्षकांसाठी काव्‍य स्‍पर्धा शिक्षक काव्य स्पर्धा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनगावात शिक्षकांसाठी काव्‍य स्‍पर्धा
शिक्षक काव्य स्पर्धा संपन्न
अनगावात शिक्षकांसाठी काव्‍य स्‍पर्धा शिक्षक काव्य स्पर्धा संपन्न

अनगावात शिक्षकांसाठी काव्‍य स्‍पर्धा शिक्षक काव्य स्पर्धा संपन्न

sakal_logo
By

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील अनगांव येथील शां. ना लाहोटी विद्यालयास साठ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील शिक्षकांसाठी काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य स्पर्धेत शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक तसेच इंग्लिश स्कूलच्या एकूण पन्नास शिक्षकांनी सहभाग नोंदविला. काव्य स्पर्धेचे परीक्षण कवी संदीप कांबळे यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विनित लेले, सभासद गणेश लेले, श्रीनिवास देव, दिलीप आनंद पायले, शाळेचे मुख्याध्यापक व्‍ही. के. शिरसाठ उपस्थित होते. या स्पर्धेत प्राथमिक विभागातून भाग्यश्री पालये आणि विनोद शिरसाठ यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकाविला; तर विशाल पाठारे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला; तर स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
माध्यमिक विभागातून चैतन्या पाटील यांनी प्रथम, सुविधा भोईर यांनी द्वितीय, मयुरी भोईर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. इंग्रजी माध्यमातून कामिनी भोईर आणि पूजा घरत यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला. तसेच प्रिया उकिडवे यांनी द्वितीय क्रमांक; तर जान्हवी घरत आणि अश्विनी मेणकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.