जातपडताळणीची पायपीट थांबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जातपडताळणीची पायपीट थांबली
जातपडताळणीची पायपीट थांबली

जातपडताळणीची पायपीट थांबली

sakal_logo
By

वसई, ता. ७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याची स्थापना होऊनही अनेक शासकीय कार्यालये ठाणे जिल्ह्यात असल्याने नागरिकांना ठाण्यात हेलपाटे मारावे लागत होते; पण आता हळूहळू जिल्ह्यातच ही कार्यालये सुरू होत असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होत असून पैसा आणि वेळेची बचत होत आहे. त्यानुसार पूर्वी ठाणे येथे असलेले जातपडताळणी कार्यालय पालघर जिल्ह्यातही सुरू झाले आहे. यामुळे जातपडताळणीसाठी नागरिकांची होणारी पायपीट थांबली असून आतापर्यंत ८०० हून अधिक प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.
पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन आठ वर्षे उलटली आहेत, अशातच जिल्हा प्रशाकीय कार्यालय उभारण्यात आले असून यात विविध कार्यालये एकाच छताखाली येत आहेत. नव्या प्रशासकीय इमारतीत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, जिल्हा क्रीडांगण, नगरचना, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, जात पडताळणी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा दुग्ध व्यवसाय, कृषी विभाग, दुय्यम निबंधक, सामाजिक वनीकरण, धर्मदाय आयुक्त अशा २५ आस्थापनांचा समावेश आहे. शिक्षण, नोकरी, ग्रामपंचायत, नगरपरिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व अन्य कामाकरिता जात प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ठाणे येथे नागरिकांना खेपा माराव्या लागत होत्या, यात वेळ, पैसा खर्च होत होता. मात्र आता पालघर जिल्हा प्रशासकीय भवनात जातपडताळी समिती स्थापन करण्यात आली आहे. आता पालघर जिल्ह्यातील जात पडताळणीचे कामकाज या कार्यालयातून सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांची फरपट थांबून एकाच ठिकाणी समस्यांचे व सूचनाचे निवारण होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
--------------
मंगळवारी वसईत पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला त्यामुळे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्ग व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


जानेवारीपासूनचे जातपडताळणी कामकाज
ठाणे येथून आलेले प्रस्ताव - ८४६
दाखले वाटप - ३,३६४
अर्ज - ३,९९३
-------------
कर्मचाऱ्यांची कमतरता
जिल्ह्यात जातपडताळणी कार्यालय सुरू आहे, नागरिकांना दाखलेही मिळत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जलद गतीने दाखले प्राप्त होण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी नागरिकांना आवश्यक असणारी कागदपत्रे याची माहिती देत आहेत त्यामुळे अर्जचा निपटारा होत आहे.
----------------
अशी आहे समिती
सहायक आयुक्त दिनकर पावरा, उपसंचालक नीलम राऊत यांचे मार्गदर्शन व जातपडताळणी समिती दक्षता पथकात उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, हवालदार यांचा समावेश आहे.