मॅरेथॉन स्पर्धा मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॅरेथॉन स्पर्धा मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद
मॅरेथॉन स्पर्धा मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद

मॅरेथॉन स्पर्धा मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद

sakal_logo
By

विरार, ता. ७ (बातमीदार) : वसई विरार महापालिका आणि वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळ आयोजित १० वी वसई विरार महापालिका मॅरेथॉन स्पर्धा व इतर शालेय स्पर्धा रविवार, ११ डिसेंबरला पार पडणार आहेत. यासाठी मॅरेथॉन स्पर्धा कालावधीत स्पर्धा मार्गांवर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असल्याचे पालिकेतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात नवीन विवा कॉलेज, विरार पश्चिम येथून, अर्ध मॅरेथॉनची सुरुवात व्हिक्टर हाईटस बिल्डिंग, वसई पश्चिम येथून; तर ११ कि.मी. पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात विवा कॉलेज येथून होणार असून या तिन्ही मुख्य स्पर्धा व इतर स्पर्धांचा फिनिश पॉईंट नवीन विवा कॉलेज असणार आहे. ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरील असून मॅरेथॉन स्पर्धेच्या वेळी सकाळी ५.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत शहरातील वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊन स्पर्धकांना अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता वरील स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. याबाबत पोलिस उपआयुक्तालयामार्फत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच ही अधिसूचना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे; पण या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेतून फायरब्रिगेड, रुग्णवाहिका, इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, महसूल विभाग, पोलिस विभाग, तालुका दंडाधिकारी, महापालिकेची वाहने, मॅरेथॉन स्पर्धेकरिता परवानगी दिलेली वाहने यांना वगळण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी स्पेशल ट्रेन
मॅरेथॉन स्पर्धेसाठी पश्चिम रेल्वे खास दोन गाड्या सोडणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. पहिली लोकल पहाटे ३ वाजता चर्चगेट येथून सुटून ४.३५ ला विरार येथे पोहोचणार आहे; तर दुसरी लोकल पहाटे ३.३० चर्चगेटवरून सुटून ५.०५ ला विरारला पोहोचणार आहे. या दोन्ही लोकल सर्व स्थानकात थांबणार आहेत.