विद्युत पेटीला झाडाचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत पेटीला झाडाचा आधार
विद्युत पेटीला झाडाचा आधार

विद्युत पेटीला झाडाचा आधार

sakal_logo
By

घणसोली, ता. ७ (बातमीदार)ः सेक्टर २३ येथे माऊली हाईट्सच्या परिसरात काही झाडांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. या झाडांना अनेक वायरींचा विळखा असून समोरील असलेल्या विद्युत डीपी बॉक्सला झाडांचा आधार देण्यात आल्याने दुर्घटनेची शक्यता आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने एकीकडे नवी मुंबईत विविध प्रयत्न केले जात आहेत; तर दुसरीकडे झाडांना विद्युत रोषणाई लावून खिळे ठोकण्याचे प्रकार सामोरे आले आहेत. असाच एक प्रकार घणसोली सेक्टर २३ येथे पाहावयास मिळाला आहे. येथे झाडांना मोठ्या प्रमाणात केबल, वायफाय तसेच अनेक प्रकारच्या तारा गुंडाळलेल्या आहेत. तसेच एका डीपी बॉक्सला चक्क झाडांचा आधार देण्यात आला आहे. त्यामुळे येथे शॉर्टसर्किट होण्याचा धोका वाढला असून महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत; तर या प्रकाराबाबत महावितरणला पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती घणसोली विभाग अधिकारी शंकर खाडे यांनी दिली आहे.