जिल्हास्तरीय थ्रो बॉल, कॅरम स्पर्धा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय थ्रो बॉल, कॅरम स्पर्धा उत्साहात
जिल्हास्तरीय थ्रो बॉल, कॅरम स्पर्धा उत्साहात

जिल्हास्तरीय थ्रो बॉल, कॅरम स्पर्धा उत्साहात

sakal_logo
By

पालघर, ता. ७ (बातमीदार) : जिल्हास्तरीय थ्रो बॉल व कॅरम स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल खारेकुरण रोड पालघर येथे करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, सोनोपन दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित होते. उपस्थिताचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली. या वेळेस पालघर जिल्ह्यातील ४०० खेळाडू, शिक्षक व प्रशिक्षक सहभागी झाले होते. उद्‌घाटनपर भाषण करताना आदिवासी ग्रामीण भागातील खेळाडूंना उच्च प्रतीचे प्रशिक्षण व सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पालघर जिल्हा क्रीडा संकुल उच्च प्रतीचे व आदर्शवत निर्माण करू व त्यास सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन प्रकाश निकम यांनी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच दांडेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. किरण थोरात यांनी केले; तर तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी आभार व्यक्त केले.