वागळे इस्टेट येथे भंगार साहित्याला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वागळे इस्टेट येथे भंगार साहित्याला आग
वागळे इस्टेट येथे भंगार साहित्याला आग

वागळे इस्टेट येथे भंगार साहित्याला आग

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ : वागळे इस्टेट येथील जुन्या ॲग्रिकल्चर ऑफिसमधील तळमजल्यावर असलेल्या भंगार साहित्याला आग लागल्याची घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना जवळपास एक तासांचा कालावधी लागला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. वागळे इस्टेट येथे तळ अधिक दोन मजली ॲग्रिकल्चर विभागाची इमारत आहे. तळ मजल्यामध्ये भंगार ठेवण्यात आले होते. त्या भंगार साहित्याला आग लागल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. यावेळी दोन अग्निशमन वाहने, दोन रेस्क्यू वाहने व एक जंबो वॉटर टँकर, एक वॉटर टँकर वाहन पाचारण करण्यात आले होते.